कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं किंवा तिचं व्यसन लागणं या दोन्ही गोष्टी वाईटचं. त्यातच आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील अनेक गोष्टींचं व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये ‘पब जी’ हा गेम अग्रस्थानावर आहे. आज अनेकांना ‘पब जी’ या गेमचे व्यसन लागलं आहे. ‘पब जी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचं सध्या सर्वच वयोगटामध्ये प्रचंड क्रेझ आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात PUBG ने धुमाकूळ घातलाय. विशेष म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो केबीसी अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये देखील या गेमची क्रेझ पाहायला मिळाली. त्यामुळेच या शोच्या नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला ‘पब जी’ या खेळाचा फुलफॉर्म विचारला.

काही दिवसापूर्वीच केबीसीचं ११ वं पर्व सुरु झालं असून नुकताच या पर्वातील २ एपिसोड झाला. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी समोर बसलेल्या स्पर्धकाला PUBG चा फुल फॉर्म विचारला.”मल्टीप्लेयर गेम PUBG चा फुल फॉर्म काय आहे?” असा प्रश्न अमिताभ यांना विचारला. मात्र हा प्रश्न विचारल्यानंतर स्पर्धक थोडासा गोंधळून गेला. विशेष म्हणजे ‘पब जी’ या खेळाचं जरी लाखो लोकांना वेड लागलं असलं तरीदेखील त्याचा फुल फॉर्म फार कमी जणांना माहित आहे.

नक्की काय आहे पब जीचा फुल फॉर्म ?

‘पब जी’ या ऑनलाइन मल्टीप्लेअर गेमचं सध्या साऱ्यांना व्यसन लागलं असून हा गेम जगभरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींकडून खेळला जात आहे. ‘पब जी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गेमचा फुल फॉर्म ‘प्लेयर्स-अनक्नोन बॅटलग्राउंड’ (PlayerUnknown’s Battleground) असा आहे. ‘प्लेयर्स-अनक्नोन बॅटलग्राउंड’ या गेमचं अनेकांना क्रेझ लागलं असून काही दिवसापूर्वी हा गेम खेळणाऱ्या प्रोफेशनल प्लेयर्ससाठी PUBG Nations Cup ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वर्ल्ड चॅंपियन बनण्यासाठी विविध देशांच्या अव्वल संघांनी आपआपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेमध्ये रशिया PUBG गेममधील पहिला वर्ल्ड चँपियन ठरला आहे.