News Flash

कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घ्यायचाय? या प्रश्नाचे उत्तर द्या..

'कौन बनेगा करोडपती' या मालिकेच्या रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेला पहिला प्रश्न असा आहे

‘कौन बनेगा करोडपती’ या सुपरहिट मालिकेचे अकरावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या अगामी मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला असुन यांत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी रजिस्ट्रेशन देखील सुरू झाले आहे. दर्शकांना या मालिकेत प्रवेश मिळवण्यासाठी एकूण पाच प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न १ मे रोजी सोनी वाहिनीवर पटियाला हाऊस या मालिके दरम्यान दाखवण्यात आला.

‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेच्या रजिस्ट्रेशनसाठी विचारण्यात आलेला पहिला प्रश्न असा आहे –

“संस्कृतमधील यापैकी कोणत्या शब्दाचा अर्थ स्वागत करणे असा होतो?”

A. नचिकेता

B. अभिनंदन

C. नरेंद्र

D. महेंद्र

‘कौन बनेगा करोडपती’ मालिकेच्या माध्यमातून करोडपती बनण्याचे स्वप्न पाहणारे स्पर्धक वरील प्रश्नाचे उत्तर ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने देऊ शकतात. यासाठी लँडलाइन, मोबाईल, एसएमएस, तसेच सोनीलिव्ह अॅप या माध्यमांचा वापर करता येईल.

या मालिकेच्या अकराव्या पर्वाची टॅगलाईन “अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी” अशी आहे. कौन बनेगा करोडपतीच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होण्याचा प्रयत्न करत असलेल्या एक महिलेला आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा असा सल्ला देताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 10:49 am

Web Title: kbc 11 registrations are now open this is the first question you need to answer
Next Stories
1 ‘सडक २’मध्ये आलिया भट्ट साकारणार ही भूमिका
2 या तारखेला प्रदर्शित होणार ‘PM नरेंद्र मोदी’ चित्रपट
3 प्रियांका, दीपिका, साराने पटकावला ‘इन्स्टाग्रामर्स ऑफ द इअर’चा किताब
Just Now!
X