सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणूनदेखील या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. अलिकडेच या शोमध्येय करमवीर एपिसोड पार पडला. विशेष म्हणजे या एपिसोडमध्ये केबीसीला ५० लाख रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक मिळाला आहे. छत्तीसगढमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या फूलबासन या महिला स्पर्धकाने चक्क ५० लाख रुपये जिंकले आहेत.

अलिकडेच रंगलेल्या करमवीर एपिसोडमध्ये फूलबासन यांच्यासोबत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये एकावर एक असे कठीण टप्पे पार पाडत फूलबासन यांनी तब्बल ५० लाख रुपये जिंकले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात सगळ्यात जास्त रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत.

हा होता ५० लाखांसाठी विचारलेला प्रश्न

यापैकी हिमालच प्रदेशमध्ये अवैध खाणकाम प्रकरणी आवाज उठवणारी पर्यावरणवादी व्यक्ती कोण?

A- किंकरी देवी

B- दया बाई

C- मानसी प्रधान

D- चुनी कोटल

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर फूलबासन आणि रेणुका या दोघी कोड्यात पडल्या होत्या. दोघींनाही या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं आणि त्यांच्याकडे केवळ एकच लाइफलाइन शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांनी एक्सपर्टचा सल्ला घेतला आणि या प्रश्नचाचं उत्तर किंकरी देवी असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे एक्सपर्टच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत फूलबासन यांनी किंकरी देवी या उत्तरावर शिक्कामोर्तब केलं आणि योगायोगाने हे उत्तर बरोबर आलं. त्यामुळे यंदाच्या पर्वात ५० लाख रुपयांची रक्कम त्या जिंकल्या आहेत.