05 December 2020

News Flash

KBC 12: १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?

जाणून घ्या काय होता प्रश्न..

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कौन बनेगा करोडपतीचे १२ वे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. गुरुवारी केबीसी १२च्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद शहरात राहणाऱ्या छवि कुमार या हॉट सीटवर बसल्या होत्या. त्यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाला गेम सोडण्याचा निर्णय घेतला.

बुद्धीमत्तेच्या जोरावर छवि यांनी ५० लाख रुपये जिंकले. दरम्यान त्यांच्या चारही लाइफलाइन संपल्या होत्या. त्यानंतर एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. चला पाहूया त्यांना विचारण्यात आलेला एक कोटी रुपयांसाठीचा प्रश्न-

२०२४ मध्ये पुरुष व महिलेला चंद्रावर पाठवण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या चंद्र मोहिमेचं नाव कोणत्या ग्रीक देवीवर आधारित आहे?

A. रिया

B. नेमेसिस

C. एफ्रोडाइट

D. आर्टेसिस

छवि कुमार यांना या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यमुळे त्यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ५० लाख रुपये जिंकले. गेम क्विट केल्यानंतर त्यांना एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आला होता. त्यावर त्यांनी A. रिया हा पर्याय निवडला. पण हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर D. आर्टेमिस असे होते. छवि यांना उत्तर ऐकल्यावर गेम सोडण्याचा निर्णय घेल्यामुळे आनंद झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 1:49 pm

Web Title: kbc 12 question for 1 crore rupees avb 95
Next Stories
1 ‘तारक मेहता..’च्या ‘गोगी’ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी; पाहा CCTV फुटेज
2 आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू
3 कुणाल खेमूने काढून घेतला भन्नाट टॅटू, पाहा ३० तास घालवून काढलेल्या या टॅटूची खासियत
Just Now!
X