24 November 2020

News Flash

KBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?

या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती नेहमी चर्चेत असतो. कौन बनेगा करोडपती सीझन १२च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये हॉटसीटवर शिवानी शंकपाल बसल्या होत्या. बुद्धीमत्तेच्या जोरावर शिवानी यांनी ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. त्यांनी १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला होता.

१२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नापर्यंत त्यांच्या सर्व लाइफलाइन संपल्या होत्या. शिवानीला १२ लाख ५० हजार रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का? चला पाहूया काय होता प्रश्न?

भारताचे कोणते राष्ट्रपती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते?

A. शंकर दयाल शर्मा
B. नीलम संजीव रेड्डी
C. राजेंद्र प्रसाद
D. सर्वपल्ली राधाकृष्णन

या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे शिवानीने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. खेळ सोडताना प्रेक्षकांना या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे हे कळण्यासाठी त्यांनी पर्याय A. शंकर दयाल शर्मा निवडला होता. पण त्यांचे हे उत्तर चुकीचे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर D. सर्वपल्ली राधाकृष्णन असल्याचे शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 11:46 am

Web Title: kbc 12 shivani sankpal quit the game on 12 lakhs rupees question avb 95
Next Stories
1 हिना खानच्या वडिलांनी ब्लॉक केले तिचे क्रेडिट-डेबिड कार्ड; अभिनेत्रीला बसला धक्का
2 ‘मिर्झापूर २’मधून हटवला जाणार ‘तो’ वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी
3 मालदीवला पोहोचव म्हणणाऱ्या चाहत्याला सोनू सूदचं भन्नाट उत्तर
Just Now!
X