27 February 2021

News Flash

मुंबईशी संबंधीत ‘या’ प्रश्नाला छोट्या स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

जाणून घ्या काय होता प्रश्न

सध्या छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती १२’ हा शो चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत लाखो रुपये जिंकताना दिसतात. नुकताच केबीसीमध्ये छोट्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील एका छोट्या स्पर्धकाला मुंबईशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे खेळ सोडावा लागला आहे.

सहावी इयत्तेमध्ये शिकणारी अलीना पटेल नुकताच केबीसीमध्ये हॉटसीटवर बसली होती. ती नवी मुंबईत राहते आहे. शोमध्ये तिच्यासोबत तिचे आई-वडिल आले असल्याचे पाहायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी तिचे नाव ‘मिस बातूनी’ ठेवले होते. अलीनाने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले आहेत. तिला २५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न अल्यामुळे गेम सोडावा लागला. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीनचा विवाह कोणत्या ब्रिटिश शासकाशी झाला होता, ज्याला हुंड्यात बॉम्बे (सध्याचं मुंबई) देण्यात आलं होतं?

या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे अलीनाने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर चार्ल्स (द्वितीय/दुसरे) असे आहे. पण २५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे अलीनाने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:43 am

Web Title: kbc 12 student special episode avb 95
Next Stories
1 “जवळपास १०० किलो वजन केलं कमी”; गणेश आचार्य यांना पाहून कपिलला बसला आश्चर्याचा धक्का
2 अंकिताने शेअर केला ‘फर्स्ट किस’ गाण्याचा व्हिडीओ, झाली सोशल मीडियावर ट्रोल
3 देवाच्या प्रेमासाठी डॉलीबाईंनी स्वीकारलं नवं आव्हान
Just Now!
X