माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती १२ सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. शोमध्ये येणारे स्पर्धक बुद्धीमत्तेच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे जिंकताना दिसतात. १७ नोव्हेंबर रोजी शोला यंदाचा दुसरा करोडपती स्पर्धक भेटला आहे आणि त्या आहेत IPS अधिकारी मोहिता शर्मा. त्यांना ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

मोहिता शर्मा या केबीसी १२च्या दुसऱ्या करोडपती ठरल्या आहेत. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर शोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत १ कोटी रुपये जिंकले. पण ७ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. काय होता ७ कोटी रुपयांचा प्रश्न-

१८१७ मध्ये दाखल झालेल्या या पैकी कोणत्या ब्रिटीश युद्धनौकेची बांधणी मुंबईतील वाडिया समुहाने केली होती?

A.एचएमएस मिंडेन
B.एचएमएस कॉर्नवॉलिस
C.एचएमएस त्रिंकोमाली
D.एचएमएस मिनी

या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे मोहिता यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर एचएमएस त्रिंकोमाली आहे. मोहिता या केबीसी १२च्या दुसऱ्या करोडपती विजेत्या ठेरल्याा आहेत.

यापूर्वी नाजिया नसीम यांनी कौन बनेगा करोडपती १२मध्ये एक कोटी रुपये जिंकले होते. त्या शोमधील एक कोटी रुपये जिंकणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या होत्या.