News Flash

चित्रपटसृष्टीशी संबंधित ‘या’ ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?

जाणून घ्या काय होता प्रश्न

kbc 13 amitabh bachchan, kbc 13, amitabh bachchan,

सध्याचा लोकप्रिय आणि तितकाच चर्चेतील शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी).’ माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणाऱ्या या शोचे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच केबीसी १३मध्ये हॉटसीटवर पश्चिम बंगालचे तुषार भारद्वाज स्पर्धक म्हणून बसले होते. त्यांनी ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे गेम सोडण्याचा निर्णय घेतला. या ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही देऊ शकता का?

तुषार हे गेल्या २० वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी बुद्धीमत्तेच्या जोरावर २५ लाख रुपये जिंकले. पण इथपर्यंत पोहोचताना त्यांच्याकडील सर्व लाइफलाइन देखील संपल्या होत्या. ५० लाख रुपयांसाठी चित्रपटसृष्टीशी संबंधित विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. पण या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

काय होता ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न:

दादासाहेब फाळके यांनी कोणत्या चित्रपटात पहिल्यांदाच दुर्गाबाई कामत यांच्याकडून अभिनय करुन घेतला होता, या चित्रपटानंतर त्या भारतीय चित्रपटसृष्टीमधील पहिल्या अभिनेत्री ठरल्या होत्या?
A.सत्यवान सावित्री
B.मोहिनी भस्मासूर
C.लंका दहन
D.गंगावतरण

तुषार यांना या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नव्हते. तसेच त्यांच्याकडे एकही लाइफलाइन शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यांनी २५ लाख रुपये घेऊन गेम सोडण्याच निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर B. मोहिनी भस्मासूर असे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 11:41 am

Web Title: kbc 13 amitabh bachchan show contestant won 25 lakhs losses for question of 50 lakh avb 95
Next Stories
1 अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक; अरुणा भाटिया काळाच्या पडद्याआड
2 फोटोग्राफर्सपासून वाचण्यासाठी गाडीच्या डिक्कीत लपायची जान्हवी कपूर!
3 जेव्हा आशा भोसले यांनी आर डी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला दिला होता नकार!
Just Now!
X