बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी)’ पर्व ११ सध्या चांगलंच चर्चेत आहे. तसेच टीआरपी यादीमध्ये हा शो टॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या केबीसीला तिसरा करोडपती स्पर्धक मिळाला आहे. शोमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि येणारे स्पर्धक शोला आणखी रंजक करतात. नुकताच शोमध्ये हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाने व्यक्त केलेली इच्छा ऐकून बिग बींना देखील शब्द सुचत नाही.

नुकताच सोनी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुढच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धक कुमार रंजन हे हॉट सीटवर बसले आहेत. दरम्यान कुमार यांनी केबीसीमध्ये जेवढे पैसे जिंकणार त्या पैश्यांमधून पत्नीला सोन्याचे मंगळसूत्र घेण्याची इच्छा असल्याचे सांगितली आहे. त्याची ती इच्छा ऐकून बिग बींना शब्द सुचत नाही. दरम्यान प्रोमोमध्ये कुमार यांना ते प्रेमाने बायकोला काय आवाज देतात असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर त्यांनी थोडं लाजत ‘बेबी’ असे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : KBCच्या या महिला स्पर्धकावर ८ जणांनी केला होता बलात्कार

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या करोडपतीच्या ११ व्या पर्वाला तिसरा करोडपती मिळाला. या करोडपत्याचे नाव गौतम झा असे आहे. बिहारच्या गौतम झा यांनी शानदार अंदाजात खेळ खळत एक कोटींची रक्कम जिंकली. तर गौतम झा यांच्यानंतर केबीसीच्या हॉट सीटवर बसलेले छत्तीसगढचे जालिम साय यांना एक्सपर्ट सल्ला ही लाइफलाइन घेऊनही सहा लाख चाळीस हजार रुपयांवर हार मानावी लागली होती. दिवसेंदिवस केबीसी हा शो रंजक होत चालला आहे.