04 December 2020

News Flash

‘मॅगी’मध्ये मिळाली दोन मसाल्याची पाकिटं; ‘केबीसी’ जिंकलेल्या मोहिता यांचं ट्विट पाहून नेटकरी चक्रावले

केबीसीमध्ये आयपीएस ऑफिसर मोहिता शर्मा यांनी एक कोटी रक्कम जिंकली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा बारावा सिझन सध्या सुरू आहे आणि या सिझनमध्ये नुकतंच आयपीएस ऑफिसर मोहिता शर्मा यांनी एक कोटी रक्कम जिंकली आहे. जम्मू – काश्मीर इथल्या मोहिता यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एकीकडे सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय ठरतोय. मोहिता यांना ‘मॅगी’च्या एका पॅकेटमध्ये मसाल्याचे दोन सॅशे मिळाले आहेत.

‘केबीसीमध्ये एक कोटी रक्कम जिंकल्यानंतर मला मॅगीच्या एका पॅकेटमध्ये दोन मसाल्याचे सॅशे मिळाले आहेत. मी इतकी नशिबवान ठरेन असा कधी विचारच केला नव्हता. देवाची आज माझ्यावर कृपा आहे’, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला. मॅगीच्या एका पॅकेटमध्ये मसाल्याचे दोन सॅशे पाहून नेटकरीसुद्धा चक्रावले आहेत.

आणखी वाचा : प्राजक्ता गायकवाड ते शिवानी सुर्वे.. ‘या’ मराठी कलाकारांनी मध्येच सोडली लोकप्रिय मालिका

मोहिता यांच्या या ट्विटला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. मोहिता यांचा खूप चांगला काळ सुरू आहे, असं म्हणत अनेकांनी त्यांच्या ट्विटवर कमेंट केली आहे. ‘ये तो कमाल हो गया’ असं एकाने म्हटलंय तर ‘आपका तो किस्मत खुल गया’ असं दुसऱ्याने लिहिलंय. केबीसीमध्ये जिंकल्यामुळे तुम्हाला मसाल्याचं एक अधिक पॅकेट मिळाल्याचं म्हणत एका युजरने मस्करी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 3:40 pm

Web Title: kbc crorepati mohita sharma gets 2 maggi masala sachets in 1 pack twitter reacts ssv 92
Next Stories
1 ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी
2 Video : करीनाच्या ‘या’ वर्तणुकीमुळे करिष्मावर आली होती ट्रोल होण्याची वेळ
3 रणवीरच्या या जाहिरातीमुळे सुशांतचे चाहते भडकले, केली बॉयकॉट करण्याची मागणी
Just Now!
X