05 July 2020

News Flash

…म्हणून मोबाइल वापरताना बिग बी करतात मिडल फिंगरचा वापर

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीही यावेळी शेअर केल्या

‘अॅग्री यंग मॅन’, ‘शहेनशहा’, ‘बिग बी’, ‘महानायक’ अशा एक ना अनेक नावांनी लोकप्रिय असलेले अमिताभ बच्चन गेले कित्येक वर्ष चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. उत्कृष्ट अभिनयशैली आणि संवादकौशल्य यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमिताभ यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अमिताभ यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये अनेक गोष्टींचं कुतूहल आहे. त्यातलंच एक कुतूहल म्हणजे प्रत्येक वेळी मोबाइल फोन वापरताना त्यांनी केलेला मिडल फिंगरचा वापर. मोबाइल वापरतांना ते मिडल फिंगरचा वापर नेमका का करतात या मागचं कारण त्यांनी स्वत: ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर सांगितलं आहे.

‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अनेकांनी करोडपती होण्याचं स्वप्न पाहण्यासोबतच त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासाही केला आहे. यामध्येच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीही शेअर केल्या आहेत. त्यातच त्यांनी मोबाइल वापरताना मिडल फिंगर का वापरतात यामागचं कारण स्पष्ट केलं.

“हाताच्या पाचही बोटांपैकी मिडल फिंगर हे इतर बोटांच्या तुलनेत मजबूत आणि मोठं असतं. त्यामुळे फोन वापरताना किंवा टॅब वापरताना एखादी गोष्ट स्क्रोल करायला हे बोट फायदेशीर ठरतं. त्यामुळे मी कायम फोन वापरतांना मिडल फिंगरचा वापर करतो”,असं अमिताभ यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘केबीसी’ची धुरा सांभाळणारे बिग बी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटातून आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन, डिंपल कपाडिया ही कलाकार मंडळीही झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 9:55 am

Web Title: kbc season 11 amitabh bachchan revealed why does he use middle finger while using mobiles ssj 93
Next Stories
1 तापसीचं ‘मिशन डेटींग’ सुरु, करते याला डेट
2 मेडिकल कॉलेजमधल्या सांस्कृतिक चळवळी
3 सोशल मीडियावर मनोज बाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ची चर्चा
Just Now!
X