24 November 2017

News Flash

‘केबीसी’चे स्वप्न १७ वर्षांपासून पाहणारी ‘ती’ घरी घेऊन गेली ‘एवढी’ रक्कम

मोठी रक्कम जिंकत त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले

मुंबई | Updated: September 14, 2017 1:32 PM

रेखा देवी, कौन बनेगा करोडपती

बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’चे नववे पर्व दिवसेंदिवस अधिक मजेशीर होत आहे. या पर्वातील १२ आणि १३वा भाग मनोरंजनाने परिपूर्ण असा होता. हरियाणातील रोहतकमधून आलेली रेखा देवी या स्पर्धकांमध्ये सध्या फार प्रसिद्ध आहे. बिग बींनी दिलेल्या प्रेरणेच्या आधारावर या महिलेने तब्बल १२ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम जिंकली.

वाचा : कपिल शर्माचा प्रेयसीसोबत ब्रेकअप?

गेल्या १७ वर्षांपासून ‘केबीसी’मध्ये जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रेखा देवींना अखेर यंदाच्या पर्वामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मोठी रक्कम जिंकत त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. रोहतकमध्ये राहणाऱ्या रेखा या पशुपालन करतात. काही काळापूर्वी त्यांच्याकडे घराची रखवालदारी करण्यासाठी ११ कुत्रेही होते. त्यांचे पती आणि मुलं कामामुळे सहसा बाहेरगावीच असतात. त्यामुळे मिळालेल्या वेळात त्या गावातील मुलींना शिवणकाम शिकवतात. त्यांना स्वतःचे बुटीक सुरु करण्याचीही इच्छा आहे.

वाचा : ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक अपघातात जखमी; मदतीऐवजी पोलीस फोटो काढण्यात मग्न

अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसताच रेखा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या संपूर्ण भागात बिग बी त्यांना सतत मार्गदर्शन करत होते. बहुदा त्यामुळेच त्यांना १२ लाख ५० हजार रुपये जिंकण्यात यश मिळाले असावे. यावेळी रेखा यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पती आणि मुलगाही उपस्थित होते. विशेष म्हणजे, रेखा यांना चित्रपट पाहण्याची फारशी आवड नाही. तसेच, त्या मुलांनाही चित्रपट पाहू देत नाही आणि मोबाईलसुद्धा वापरू देत नाहीत. आपल्या आईने लावलेल्या या सवयींकडे त्यांची मुलं निर्बंध म्हणून न पाहता चांगली सवय म्हणून बघतात.

First Published on September 14, 2017 1:32 pm

Web Title: kbc season 9 rekha devi the housewife from haryana quits only to get lucky