21 October 2018

News Flash

केदार शिंदे घेऊन येतोय ‘रंगीला रायबा’

जाणून घ्या, हा रंगिला रायबा आहे तरी कोण?

रंगीला रायबा

आजपर्यंत एकापेक्षा एक धमाल कलाकृती साकारल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे ‘रंगीला रायबा’ हा एक रंगतदार असा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘रंगीला रायबा’चे कलरफुल पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. ‘Atitude is everything’ अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट वितरक विजय बाबू डी. यांची विजय साई प्रॉडक्शन ही संस्था आणि या पोस्टरमध्ये दिसणारे फ्रेश चेहरे आल्हाद आणि राधिका हे ‘रंगीला रायबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. अतिशय रंगतदार पोस्टर आणि हटके नाव यामुळे ‘रंगीला रायबा’चा पोस्टर अल्पावधीतच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘रंगीला रायबा’ ची कथा त्रिनधा राव यांनी तर पटकथा चिन्मय कुलकर्णी यांची आहे. तसेच चिन्मय कुलकर्णीसोबत चेतन डांगे यांनी या चित्रपटाचे खुसखुशीत संवाद लिहिले आहेत. छायालेखन सुरेश देशमाने तर संकलन मनिष मिस्त्री यांनी केले आहे. संगीत पंकज पडघन आणि निषाद तर पार्श्वसंगीत शेखर चंद्रा यांचे आहे. कार्यकारी निर्माता सुरेश शिंदे आहेत.

कलरफुल दिवाळीत प्रदर्शित झालेल्या कलरफुल पोस्टरवरचा हा ‘रंगीला रायबा’ १० नोव्हेंबर पासून आपल्याला भेटायला येत आहे.

First Published on October 23, 2017 1:20 pm

Web Title: kedar shinde new upcoming movie rangeela rayba poster