News Flash

“नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाउनचा नियम नाही का?”, केदार शिंदेचा सवाल

सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून केलं भाष्य

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने शासनाने कडक निर्बंध लावले आहे. राज्यभरात लॉकडाउन लावण्यात आला असून लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशातच नेत्यांच्या आसपास होणाऱ्या गर्दीवरुन दिग्दर्शक केदार शिंदेने टीका केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केदारने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”

 

यापूर्वीही त्याने देशातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. या स्टोरीमध्ये तो म्हणतो, “भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष….”

केदारने सोबत ऑक्सिजन सिलेंडरचा फोटोही पोस्ट केला आहे. सध्या देशात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना प्राणही गमवावे लागले आहेत. देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय सुविधांची कमतरता भासत असल्याने आता प्रशासन टीकेचा विषय बनलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 12:58 pm

Web Title: kedar shinde posted a story said that politicians dont have lockdown vsk 98
Next Stories
1 ‘मला धक्काच बसला..’, बिग बॉसच्या घरात राहुलने लग्नासाठी विचारताच अशी होती दिशाची प्रतिक्रिया
2 ‘सुल्तान’मधील अभिनेता कुमुद मिश्रा यांना झाला करोना
3 ‘तुझा स्तनपानाचा व्हिडीओ शेअर करशील का?”; नेहा धुपियाने ‘तो’ फोटो शेअर करत दिलं उत्तर
Just Now!
X