News Flash

केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

पाहा पोस्टर

मराठी प्रेक्षकांना जवळून ओळखणारे दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे. सामान्य माणसाच्या आजुबाजूला जे काही होत असतं ते केदार शिंदे उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवतात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून लांब होते. आता केदार शिंदे एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर अतिशय वेगळ्या अंदाजात प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गॉगल आणि त्यावर चंद्रकोर असल्याचे दिसत आहे. त्यासोबत ‘नो टेन्शन, फुल्ल टशन.’ पोस्टरवर असलेल्या या वाक्याने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “आता खऱ्या अर्थाने लॉकडाऊन संपेल नो टेन्शन, फुल्ल टशन” असे कॅप्शन केदारने हे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedhar Shinde (@kedaarshinde)

‘बाईपण भारी देवा’या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्या स्क्रीनशॉट्स या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था याच चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. टीव्ही, ओटीटी आणि अनेक क्षेत्रात स्क्रीशॉर्टस संस्थेने दर्जेदार कलाकृती करत आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात आले आहेत. या चित्रटात कोण कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट २८ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 2:48 pm

Web Title: kedar shinde s baipan bhaari deva s poster releised dcp 98
Next Stories
1 बर्थडे गर्ल कंगनाचे 5 आगामी सिनेमे; स्त्री केंद्रित भूमिकांना क्विनची पसंती
2 दिशा वकानीने सोडली मालिका, ‘तारक मेहता…’च्या चाहत्यांना मोठा धक्का
3 ‘महाभारत का दुसरा नाम है जया,’ कंगनाच्या बहुप्रतिक्षित ‘थलायवी’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X