सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा बॉलिवूड पदार्पणापूर्वीच एक चाहतावर्ग तयार झाला आहे. सारा आणि सुशांत सिंग राजपूतच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. चित्रपटाच्या पहिल्या सत्राचं शूटिंग उत्तराखंडमध्ये झालं असून उर्वरित शूटिंग मुंबईत होणार आहे. येत्या काही दिवसांतच शूटिंगला सुरुवात होईल.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील फिल्म सिटीमध्ये चित्रपटासाठी मोठा सेट तयार करण्यात आला आहे. यासाठी बराच पैसा खर्च करण्यात आला असून केदारनाथ शहराची प्रतिकृती उभारण्यात आली. यात केदारनाथ मंदिराचादेखील समावेश आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आहे. पूरजन्य परिस्थितीचं शूटिंगसुद्धा मुंबईतच केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी पाण्याच्या टँकर्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/BbwuXV0BSLB/

हा सेट उभारण्यासाठी निर्मात्यांना जवळपास ७ कोटींचा खर्च आला. चित्रपटाचा बहुतांश भाग केदारनाथमध्ये शूट झाला. मात्र, काही अडथळ्यांमुळे पूरजन्य परिस्थितीचं शूटिंग तिथे होऊ शकलं नाही. म्हणून मुंबईतच केदारनाथचा सेट उभारण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

वाचा : उल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन माहित आहे का?

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सारा आणि सुशांत हे प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.