26 September 2020

News Flash

Video: ‘काफीराना सा है, इश्क है या क्या है’; सारा- सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री

केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या चित्रपटात एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत, सारा अली खान

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात सारासोबत सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिका साकारत आहे. बऱ्याच अडचणींनंतर या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यापाठोपाठ ‘केदारनाथ’मधील काही गाणीसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘नमो नमो’, ‘स्वीटहार्ट’ या गाण्यानंतर आता ‘काफीराना’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सुशांत आणि साराने सोशल मीडियावर हे गाणं शेअर केलं आहे.

अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘काफीराना सा है, इश्क है या क्या है’ हे गाणं अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात सारा- सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या चित्रपटात एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा दावा केदारनाथमधील काही हिंदू संघटनांनी केला असून त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 6:59 pm

Web Title: kedarnath new song qaafirana narrates a budding love story sara ali khan sushant singh rajput
Next Stories
1 आदेश श्रीवास्तव यांच्या मुलाचं संगीत क्षेत्रात पदार्पण
2 Photos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे
3 वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा ‘पियानो फॉर सेल’
Just Now!
X