News Flash

Kedarnath Trailer : ये पूरे केदारनाथ की बात है

ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये सारा अली खानसोबत सुशांत सिंह राजपूतची मुख्य भूमिका आहे. बऱ्याच अडचणींवर मात केल्यानंतर अखेर साराच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा शानदार ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ‘केदारनाथ’मधील नयनरम्य दृश्यांसह विनाशकारी महाप्रलयदेखील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे मनोहारी दृश्यांसोबतच दाखविण्यात आलेला प्रलय अंगावर काटा आणतो.

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा दावा केदारनाथमधील काही हिंदू संघटनांनी केला असून त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट वादामध्ये सापडल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा वाद सुरु असतानादेखील दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी ट्रेलर प्रदर्शित केला. यावेळी सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 4:30 pm

Web Title: kedarnath trailer sushant singh rajput and sara ali kedarnath trailer out
Next Stories
1 Video : करिनाच्या ‘या’ भावाशी सारा खानला करायचं लग्न ?
2 Video : लग्नासाठी आतूर रणवीर विमानतळावर वाजवत होता ‘हे’ गाणं
3 दीप- वीरच्या लग्नासाठी सजला व्हिला, पाहा फोटो
Just Now!
X