पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. परिणामी कृष्णवर्णीय लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला थोपवण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या गोळीबारात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागल्या आहेत.

जॉर्ज फ्लॉइडच्या संशयास्पद मृत्यूमुळे कृष्णवर्णीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी थेट व्हाईट हाऊससमोर जाऊन निदर्शनं केली. या आंदोलनात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन देखील सामिल होता. दरम्यान झालेल्या रबरी गोळीबारात तो जबर जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागल्या आहेत. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच्यावर लाठीहल्ला देखील केला, असा आरोप त्याने केला आहे. केन्ड्रिकने आपले आरोप सिद्ध करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस आंदोलन कर्त्यांवर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

I cut this together from both of our IG live stream POVs. Keep in mind, I don’t know this man AT ALL. I want to make this really clear. He was targeted because he called out the undercover cops in the LAPD. He said that the people throwing things (water bottles and such) at the police are not protesters, they are undercover cops (agent provocateurs/infiltrators) who are agitators and trying to give justification to the brutality. He said over the bullhorn to turn your camera’s on the people throwing stuff and call them out because they are LAPD!! VERY shortly after, he was tackled and the people around him were viciously brutalized as you can see in this video to ensure no interference even though no one was interfering. Now to be clear, I don’t EVER advocate for turning your camera on a protestor. I am not demonizing or denouncing the tactics we use to dismantle police/slave catching or #DefundPolice. We have to be creative and relentless. I am not demonizing or denouncing the way we get to express our rage, grief, mourning or trauma in this moment. And I’m talking about Black people. Non Black people – especially white folks – know that what you do at these protests directly affects the lives of Black protesters as you scream #BlackLivesMatter BUT apparently in this moment – HE KNEW SOMETHING or he FELT something. And apparently he happened to be right. I have some videos I’m sorting through now. And he was targeted for it. #DefundthePolice #DefendBlackLives #ProsecuteKillerCops

A post shared by Kendrick Sampson (@kendrick38) on

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वातावरण पेटलं आहे. लोक करोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच द्यायला सुरुवात केली आहे.