News Flash

Kerala Floods : ‘फक्त आर्थिकच नव्हे तर इतर मार्गांनीही केरळला मदत करा’

पूराचं पाणी ओसरल्यानंतरच राज्याचं झालेलं नुकसान आणि त्याचा खरा आकडा समोर येणार

जावेद अख्तर, Kerala Floods

Kerala Floods. शतकातील सर्वात मोठ्या महापूराचा सामना केल्यानंतर आणि त्याच्या तडाख्यातून बचावल्यानंतर आता केरळ राज्य पुन्हा एकदा उभं राहू पाहात आहे. कित्येक कोटींच्या नुकसानासोबतच जिवीत हानीमुळेही या राज्यावर निसर्गाने एक प्रकारे आघातच केला होता. यातूनच केरळवासिय आता स्वत:ला सावरु पाहात आहेत. यामध्ये ते एकमेकांना आधार देत असून, इतरही बऱ्याच मार्गांनी दक्षिणेकडील या राज्याकडे मदतीचा ओघ येण्यास सुरुवात झाली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ज्यावेळी आपल्या राज्याची मदत करण्याचं आवाहन इतरांना केलं होतं. त्यानंतर अनेकांनीच मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आपलं योगदान देण्यास सुरुवात केली. यामध्ये कलाकार मंडळीही मागे राहिली नाहीत. सध्याच्या घडीला केरळवासियांना फक्त आर्थिकच नव्हे, तर इतरही विविध मार्गांनी मदत करण्याची गरज असल्याचं मत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. #IndiaForKerala या मोहिमेशी जोडलं गेलेल्या अख्तर यांनी एका कार्यक्रमात हे मत मांडलं.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

पूरग्रस्तांविषयी आपली सहानूभुती व्यक्त करत, त्यांच्या समोर ठाकलेल्या परिस्थितीची जाणिव असल्याचं ते म्हणाले. पूराचं पाणी ओसरल्यानंतरच राज्याचं झालेलं नुकसान आणि त्याचा खरा आकडा समोर येणार असल्याचं सांगत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आता केरळमध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासोबतच इतर मार्गांनीही त्यांना मदत करावी असं आवाहन त्यांनी दिलं. मग ही मदत कोणत्याही स्वरुपात असू शकते.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

केरळमध्ये आलेल्या पुरानंतर अनेक गावं पाण्याखाली गेली होती. पुराच्या पाण्यात केरळातील अनेकांना आपला निवाराही गमवावा लागला आहे. त्यामुळे आता हजारो लोकांपुढे आपल्या आयुष्याती शून्यातूनच सुरुवात करण्याचं आवाहन आहे, हेसुद्धा तितकच खरं. परिस्थिती इतकी बिकट असूनही केरळवासियांचं मनोबल मात्र काही केल्या कमी झालेलं नाही. पुन्हा एकदा त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, सर्वांपुढे जणू एक आदर्शच ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 2:03 pm

Web Title: kerala floods we should help the people of kerala not just by funding but by all means says lyricist javed akhtar
Next Stories
1 शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार खुशी कपूर
2 ‘बिग बीं’बरोबर केलेल्या तुलनेविषयी अभिषेक म्हणतो..
3 PHOTOS : असा पार पडला ‘जय मल्हार’ फेम सुरभी हांडेचा साखरपुडा
Just Now!
X