बॉलिवूडमध्ये २०१९ हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षांत सर्व सुपरस्टार कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मार्च महिना संपत आलाय आणि या तीन महिन्यात बॉलिवूडमध्ये डझनभर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यातील प्रमुख ६ चित्रपटांची कमाई जाणून घेऊ एका क्लिकवर.

उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स
जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला प्रदर्शित झालेला हा चित्रपट अडीच महिन्यांनंतरही अनेक चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. २०१९ मधला पहिला सुपरहिट चित्रपट ‘उरी’ ठरला आहे. या चित्रपटानं अडीच महिन्यात २४३ कोटींची कमाई केली आहे.

गली बॉय
व्हेलेंटाइन डेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं खूप प्रशंसा मिळवली. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या २६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं १९.३० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटानं एकूण १३९. ३८ कोटींची कमाई केली आहे.

gully-boy

टोटल धमाल
अजय देवगण, माधुरी दीक्षित , रितेश देखमुख, अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांची पसंती लाभलेल्या या चित्रपटानं आतापर्यंत १५०. ७६ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

 

लुकाछुपी
क्रिती सॅनॉन आणि कार्तिक आर्यन यांची भूमिका असलेला ‘लुकाछुपी’ही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ४ आठवड्याच्या यशस्वी कामगीरीनंतर या चित्रपटानं एकूण ९० कोटी कमावले आहे. लीव्ह इन रिलेशन आणि त्यातून उडालेला गोंधळ अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला आहे.

बदला
मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका आहे. ‘पिंक’ चित्रपटानंतर दुसऱ्यांदा या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटानं ९०.४९ कोटींची कमाई केली आहे.

badla

केसरी
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ची बॉक्स ऑफिसवर घौडदौड सुरू आहे. सहा दिवसांत या चित्रपटानं ९३.४९ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट या आठवड्याअखेरपर्यंत १५० कोटींहून अधिकचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सारागढीच्या युद्धावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे.