X

Kesari First Look poster : अक्षयच्या ‘केसरी’ची पहिली झलक

२२ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षयकुमार कायमच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्राधान्य देत असतो. त्यामुळे तो आता लवकरच ‘केसरी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा स्क्रिन शेअर करणार असून नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

‘केसरी’ या चित्रपटातून ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. १८९७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धातील ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांची शौर्यगाथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये शीख रेजिमेंटची तुकडी दिसून येत आहे. विशेष म्हणजे या साऱ्यांच्या चेहऱ्यावर एक करारी भाव दिसून येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी करण जोहरने स्वीकारली असून पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर करण जोहरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा चित्रपट २२ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.