29 September 2020

News Flash

अक्षयच्या ‘केसरी’ला पायरसीचा फटका, चित्रपट लीक

'तामिळ रॉकर्स'वर हा चित्रपट लीक झाला आहे.

चित्रपटाची ‘पायरसी’ रोखण्यास गेल्या काही वर्षांपासून निर्माते, दिग्दर्शकांना अपयश येत आहे. याचा मोठ्या प्रमाणात फटका चित्रपटाच्या कमाईवर होताना दिसत आहे. अक्षयचा ‘केसरी’ हा देखील पायरसीला बळी पडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस उलटत नाही तोच केसरी इंटरनेटवर लीक झाला आहे.

पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘तामिळ रॉकर्स’वर हा चित्रपट लीक झाला आहे. तामिळ रॉकर्स या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या साइटवर बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यापूर्वी ‘2.0’ च्या टीमनं तामिळ रॉकर्स आणि त्याच्या मायक्रोसाइटवर बंदी घालण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. ३ हजार मायक्रो साइटसवर बंदी घालूनही हा चित्रपट लीक झाला होता.

सुरूवातीला दाक्षिणात्य चित्रपट या साइवटरून लीक व्हायचे मात्र आता बॉलिवूड चित्रपटही लीक व्हायला सुरूवात झाली आहे. अक्षयचा केसरी २१ मार्चला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची चांगली गर्दी सिनेमागृहात पाहायला मिळाली. जवळपास २१ कोटींचा गल्ला या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावला मात्र ऑनलाइन हा चित्रपट लीक झाल्यानं कदाचित चित्रपटाच्या कमाईवर याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती निर्मात्यांनी वर्तवली आहे.  यापूर्वी ‘बदला’, ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक्स’ , ‘टोटल धम्माल’, ‘पद्मावत’ यांसारखे चित्रपट लीक झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 1:42 pm

Web Title: kesari full hd movie leaked online by tamilrockers
Next Stories
1 बॉक्स ऑफीसवर चढला ‘केसरी’चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई
2 मोदींच्या बायोपिकवर बंदी घाला, काँग्रेसनंतर आता डीएमकेची मागणी
3 ‘चला हवा येऊ द्या’मध्ये आमिर-किरणचा मराठमोळा अंदाज
Just Now!
X