सध्याच्या घडीला एखाद्या चित्रपटाची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये चित्रपटाच्या बजेटपासून ते चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. काही चित्रपटांना तर सेन्सॉर बोर्डाची झळही लागते. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक सुजय डहाकेने ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितला आहे.
कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचातुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवणारा सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुजय डहाकेटची पुन्हा एकदा तंत्रावरची हुकूमत दाखवून जातो. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 6:54 pm