‘केजीएफ’ चित्रपट फेम अभिनेता यश व त्याची पत्नी राधिका पंडित यांच्या मुलाचा नुकताच नामकरण विधीसोहळा पार पडला आहे. या सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ यश आणि राधिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोबतच त्यांच्या चिमुकल्याचं नाव काय ठेवलं हेदेखील सांगितलं आहे.
राधिकाने मंगळवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुलाचं विधीवत नामकरण सोहळा सुरु असल्याचं दिसून येत आहे. तसंच तिने काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यात यश , राधिका, मुलगी आर्या आणि त्यांचा लहान मुलगा दिसून येत आहे. “तो एक ज्याच्यामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. सोबतच मुलाचं नाव ‘यथर्व’ ठेवल्याचंही तिने सांगितलं.
View this post on Instagram
दरम्यान, यथर्व या नावाचा अर्थ पूर्णत्व असा होतो असंही यशने या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. यशला यथर्वसोबतच एक लहानशी मुलगीदेखील आहे. आर्या असं तिचं नाव असून ती दिड वर्षांची आहे. यश हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. २००८ साली मोगीना मनसू या चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात अभिनेत्री राधिका पंडितने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर या दोघांनी लग्न केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 4:42 pm