दक्षिणात्य सुपरस्टार यशने ‘KGF’ या चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. यश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकताच यशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यशने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत यश त्याच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओत यशचा मुलगा त्याच्या गालावर मारतो आणि त्याला हसवण्यासाठी यश लगेच आवाज काढतो. वडिल आणि मुलाचा हा मस्ती करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर या व्हिडीओला १४ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

यशने २००८ मध्ये कन्नड चित्रपट ‘मोगिना मनसु’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. यशला खरी प्रसिद्धी ही ‘मोदालासाला’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात यशसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री राधिका असून त्याने तिच्याशी २०१६ मध्ये लग्न केलं.

‘केजीएफ’ या चित्रपटामुळे यशला रॉकी या नावाने सगळे ओळखू लागले. यशच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या टीझरला चाहत्यांनी पसंती दाखवली आहे. या चित्रपटात यश सोबत अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन दिसणार आहे.