News Flash

Video : ‘KGF’ स्टार यश पुन्हा एकदा होणार बाबा

कोणाच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल असा हा व्हिडीओ आहे

सध्या बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांची चलती पहायला मिळते. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘केजीएफ: चॅप्टर वन’. या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. या चित्रपटातील कलाकार यशला तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता यशने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तो पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे.

काही दिवसांपूर्वीच यश आणि त्याची पत्नी राधिका पंडितने त्यांच्या ६ महिन्यांच्या मुलीच्या बारशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता यशने तो पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. हे सांगण्यासाठी त्याने त्याच्या मुलीचा अत्यंत सुंदर पद्धतीने व्हिडीओ करुन पोस्ट केला आहे. कोणाच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आणेल असा हा व्हिडीओ आहे. ‘YGF चॅप्टर २’ असे कॅप्शन त्याने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

याआधी ही यशने त्याच्या मुलीच्या बारश्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये यश बारश्याचे विधी करताना दिसत आहे.

‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. ‘केजीएफ: चॅप्टर टू’ येणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 5:09 pm

Web Title: kgf star yash announce that he is having second baby avb 95
Next Stories
1 टकाटकमधील ‘या’ दृश्यामुळे प्रथमेश परब आजारी
2 दीपिकाला साकारायची आहे ‘या’ खेळाडूची भूमिका
3 सेन्सॉर बोर्डाच्या सदस्याकडून ‘कबीर सिंग’ला विरोध, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Just Now!
X