सध्या बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपटांची चलती पहायला मिळते. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘केजीएफ: चॅप्टर वन.’ या चित्रपटाने दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. या चित्रपटातील कलाकार यशला तर चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. यश त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना त्याच्या आयुष्यात सुरु असलेल्या गोष्टींबद्दल सांगत असतो. पण आता यशची पत्नी राधिका हिने सोशल मीडियावर यश सोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यशची पत्नी राधिका पंडित आजकाल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राधिका आणि यश केजीएफ चित्रपटातील ‘गली गली मैं’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये यश आणि राधिकाची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सध्या त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना ‘मी अजूनही तुझ्या तालावर नाचत आहे’ असे राधिकाने म्हटले आहे. यश आणि राधिका डिसेंबर २०१६ मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांना सहा महिन्याची लहान मुलगी आहे. तिचे नाव आर्या आहे आणि यशने आता तो पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे सांगितले आहे. हे सांगण्यासाठी त्याने त्याच्या मुलीचा अत्यंत सुंदर पद्धतीने व्हिडीओ करुन पोस्ट केला होता.