01 October 2020

News Flash

‘खाली पीली’मधील नवे गाणे प्रदर्शित होताच डिसलाईकचा भडीमार

यापूर्वी आलिया भट्टच्या सडक २ चित्रपटाला सर्वाधिक डिसलाइक मिळाले होते.

अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लवकर ‘खाली पीली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटामधील ‘तहस-नहस’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच गाण्याला लाइक पेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहेत.

‘तहस-नहस’ या गाण्यात ईशान आणि अनन्याचा डान्स पाहण्यासारखा आहे. पण ते दोघं स्टार किड्स असल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गाण्याला लाइकपेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहेत. हे गाणे प्रदर्शित होताच २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. या गाण्याला ३६ हजार लाईक्स आणि एक लाखापेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील स्टार किड्सवर सध्या जोरदार टीका होत आहे. स्टार किड्सच्या प्रत्येक चित्रपटावर डिसलाईक्सचा भडीमार होत आहे. अलिकडेच महेश भट्ट यांच्या सडक २ ने डिसलाईकचा विक्रम केला होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी ‘खाली पीली’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने ईशान आणि अनन्या पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मकबूल खान यांनी केले आहे. चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:40 pm

Web Title: khaali peeli new song tehas nehas recived more dislike avb 95
Next Stories
1 शौविक चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये वाढ; NCBने केली खास मित्राला अटक
2 “बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप
3 ..म्हणून संजय दत्तने अचानक सोडली मुंबई
Just Now!
X