26 January 2021

News Flash

नेपोटिझम वादाचा आणखी एका चित्रपटाला फटका; टिझरवर पडतोय डिसलाईकचा पाऊस

स्टार किड्समुळे सडक २ नंतर आणखी एका चित्रपटाला नेटकऱ्यांचा विरोध

अभिनेता इशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा एक नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘खाली पीली’ असं आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. हा टिझर प्रेक्षकांना फारसा आवडलेला नाही. लक्षवेधी बाब म्हणजे प्रेक्षकांनी या टिझरवर डिसलाईकचा भडिमार केला आहे. काही तासांत आतापर्यंत सात लाखांपेक्षा अधिक डिसलाईक या टिझरला मिळाले आहेत.

अवश्य पाहा – सासू-सुनेच्या भांडणावर रॅप साँग; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील स्टार किड्सवर सध्या जोरदार टीका होत आहे. स्टार किड्सच्या प्रत्येक चित्रपटावर डिसलाईक्सचा भडीमार होत आहे. अलिकडेच महेश भट्ट यांच्या सडक २ ने डिसलाईकचा विक्रम केला होता. त्यानंतर आता नेटकऱ्यांनी ‘खाली पीली’ या चित्रपटावर निशाणा साधला आहे. या चित्रपटात इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. दोघेही स्टार किड्स आहेत. त्यामुळे आता ‘खाली पिली’वर देखील डिसलाईकचा भडिमार होत आहे. ‘खाली पिली’च्या टिझरला काही तासांत आतापर्यंत युट्युबवर सात लाख १९ हजार डिसलाईक मिळाले आहेत.

अवश्य पाहा – बदला घ्यायला येतेय नवी ‘नागिन’; एकता कपूरने शेअर केले अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

सुशांत प्रकरणात आलं नवं वळण

सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. सीबीआयची १० सदस्यीय टीम मुंबईत दाखल झाली आहे. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:01 pm

Web Title: khali peeli teaser dislike ananya panday ishaan khattar mppg 94
Next Stories
1 Video : कंपूशाहीमुळे मराठी सिनेमा वाढलेला नाही- लेखक क्षितिज पटवर्धन
2 “इमारत असो व समाज पाया हा मजबुतच हवा”; सुबोध भावेने महाड दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख
3 “त्यासाठी सुशांत घेणार होता मोदींची भेट”; नंदिनी शर्मांचा खुलासा
Just Now!
X