बॉलिवूड म्हटलं की इथे वेगवेगळ्या चर्चा रोज रंगत असतात. त्यातच सध्या सगळ्यांचं लक्ष स्टारकिड्सकडे वेधलं आहे. यात तैमूर, आलिया भट्ट असे अनेक स्टारकिड्स कायमच चर्चेत असतात.मात्र, यावेळी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची लेक खातिजा रहमान चर्चेत आली आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खातिजादेखील संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येत आहे.
अलिकडेच खातिजाने ‘फरिश्तो’ या गाण्याच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे खातिजाने या गाण्यातून एक मोलाचा संदेश दिला आहे. “मला माझ्या गाण्यातून एक खास संदेश सगळ्यांना द्यायचा होता. मात्र या गाण्यातून श्रोत्यांचं मनोरंजन होईल हे नक्की. संगीत हे असं माध्यम आहे ज्याच्यातून आपण सगळ्यांपर्यंत एक खास संदेश पोहोचवू शकतो. या गाण्याच्या माध्यमातून एका स्त्रीची, महिलेची कथा मांडण्यात आली आहे”, असं खातिजा म्हणाली.
दरम्यान, खातिजा लाइमलाइटपासून दूर असली तरीदेखील अनेकदा चाहत्यांमध्ये तिच्या चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे खातिजा ‘फरिश्तो’नंतर आणखी एक संदेश देणारं गाणं घेऊन प्रेक्षक, रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, तिचं हे नवीन गाणं कधी येणार हे अद्याप निश्चित नसल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 4:27 pm