28 September 2020

News Flash

करिश्मा तन्नाने तोंडाने उचलला साप, व्हिडीओ व्हायरल

करिश्माच्या चेहऱ्यावरील भीती दिसत आहे

टेलिव्हिजन विश्वातील काही गाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे करिश्मा तन्ना. ‘लव स्कूल’, ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’ यांसारख्या कार्यक्रमांतून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खतरों के खिलाडी पर्व १०मध्ये सहभागी झाली आहे. शोमध्ये एकीकडे शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टी स्पर्धकांना भीतीवर मात करण्यास प्रोत्सोहन देत आहे तर दुसरीकडे हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास देखील पुढे आहे. सध्या या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा तन्नाने तोंडाने साप उचलला असल्याचे दिसत आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने खतरों के खिलाडीच्या पुढील भागाचा प्रमो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. या प्रमोमध्ये करिश्मा एक टास्क करताना दिसत आहे. तिने तोंडाने साप उचलून दुसऱ्या कंटेनरमध्ये टाकले आहेत. हा टाक्स पाहायला जितका कठीण वाटत आहे त्याहून अधिक भीती करताना वाटत असल्याचे करिश्माच्या चेहऱ्यावरुन दिसत आहे. तसेच प्रमो पाहता या टास्कमध्ये करिश्मासोबत भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचिया देखील दिसत आहे. ज्या कंटेनरमध्ये करिश्मा साप ठेवत आहे. त्याच कंटेनरमध्ये हर्ष उभा आहे. दरम्यान तो करिश्मासोबत मस्ती करताना दिसत आहे. हा भाग आज प्रदर्शित होणार आहे.

खतरों के खिलाडी पर्व १०मध्ये करिश्‍मा तन्‍ना, राणी चॅटर्जी, करण पटेल, आरजे मलिष्‍का, अदा खान, श‍िविन नारंग, धर्मेश येलांदे, बलराज स्‍याल, तेजस्‍वी प्रकाश, अमृता खानविलकर यांनी सहभाग घेतला आहे. पण पहिल्याच आठवड्यात राणी चॅटर्जीला टास्क हरल्यामुळे घरी परतावे लागले आहे. तसेच शोमध्ये अभ‍िषेक वर्मा, स्‍मृति कालरा, सलमान यूसुफ खान, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, बीर मायरा पाहुणे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 11:26 am

Web Title: khatron ke khiladi 10 karishma tanna pick up snakes in mouth for task rohit shetty tejasswi prakash avb 95
Next Stories
1 जाणून घ्या कपिल शर्माच्या सर्वात महागड्या ५ गोष्टी
2 ऐतिहासिक चित्रपटांचे पर्व
3 पाहुणे असंख्य पोसते मराठी
Just Now!
X