News Flash

Khatron Ke Khiladi 11: शॉकिंग एलिमिनेशन! आस्था गिलसह आणखी चार जण शोमधून आऊट

वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार. आऊट झालेले हे पाच ही स्पर्धक पुन्हा एकदा वाईल्ड कार्डने एन्ट्री करणार.

(Photo: Instagram@aasthagil)

स्टंट बेस्ट रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ हा सर्वात लोकप्रिय शो ठरला आहे. याचं सुत्रसंचालन रोहित शेट्टी करतोय. या शोमध्ये टीव्ही क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसून येतात. ‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या सीजनची शूटिंग केपटाउनमध्ये सुरूय. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे या सीजनमध्ये झळकणार आहेत. या शो मधील सगळेच कलाकार त्यांचे वेगवेगळे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात या शोमधून स्पर्धकांच्या एलिमिनेशसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. या शोमध्ये एक नाही, दोन नाही तर पाच जण शोमधून आऊट झाले आहेत.

या शोमधली स्पर्धक आस्था गिल हिने नुकतंच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ती यंदाच्या आठवड्यात शोमधून आऊट झाली असल्याचा अंदाज बांधला जातोय. तिच्यासोबत निक्की तांबोळी, महक चहल, सौरभ राज जैन आणि अनुष्का सेन हे चार जण सुद्धा शोमधून आऊट झाले आहेत. आस्था गिल हिने पोस्टमध्ये लिहिलं, “धन्यवाद केप टाउन, मला इतक्या सुंदर आठवणी दिल्याबद्दल…या आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतील…”. या पोस्टमध्ये तिने रेड हार्ट इमोजी देखील वापरला आहे. सोबतच तिने या पोस्टमध्ये #kkk11 #AasthaGill #AGOG #paanipaani #capetown. (sic) हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aastha Gill (@aasthagill)

या शोमध्ये झालेल्या मास एलिमिनेशनमुळे आता शोमधील टॉप ८ स्पर्धकांमध्ये अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, दिव्यांका त्रिपाठी, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, श्वेता तिवारी, सना मकबूल हे सामील झाले आहे.

या शोमधून वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे. कारण मास एलिमिनेशनमुळे आऊट झालेले हे पाच ही स्पर्धक पुन्हा एकदा वाईल्ड कार्डने एन्ट्री करणार असल्याचं बोललं जातंय. करोना महामारीमुळे सर्व विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अशात कोणतेच नवे स्पर्धक या शोमध्ये सामिल होण्यासाठी केप टाउनला येऊ शकणार नाहीत. म्हणूनच जे पाच स्पर्धक आऊट झाले आहेत, तेच परत वाईल्ड कार्डने एन्ट्री करणार असल्याचं बोललं जातंय. पण यात किती सत्य आहे, हे शो ऑन एअर झाल्यानंतर कळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 10:30 pm

Web Title: khatron ke khiladi 11 eliminations aastha gill along with 4 other contestants evicted from the show prp 93
Next Stories
1 पासपोर्ट प्रकरणात आमिर खानवर भडकली कंगना रनौत; म्हणाली, “जेव्हा आमिर असहिष्णुतावर बोलला तेव्हा नाही का….”
2 अल्का याज्ञिकसोबत हिमेश रेशमियाचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल; फॅन्स म्हणाले, “हे तर फारूख शेख आहेत..”
3 चहापानाला गेला आणि काढा पिऊन आला; मनीष पॉल आणि स्मृती इराणींच्या भेटीचा मजेदार किस्सा
Just Now!
X