News Flash

‘खतरों के खिलाडी’मध्ये मोठा ट्विस्ट; एक नाही, दोन नाही तर पाच स्पर्धकांना शोमधून केलं आऊट

या शोमध्ये पहिल्यांदा मास एलिमिनेशन झालेलं पहायला मिळणार आहे. जर या शोमधून एकाच वेळेला पाच स्पर्धक आऊट झाले तर शोसाठीचे आठ टॉप स्पर्धक मिळणार आहेत.

स्टंट बेस्ट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ हा सर्वात लोकप्रिय शो ठरला आहे. याचं सुत्रसंचालन रोहित शेट्टी करतोय. या शोमध्ये टीव्ही क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसून येतात. ‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या सीजनची शूटिंग केपटाउनमध्ये सुरूय. मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे या सीजनमध्ये झळकणार आहेत. या शो मधील सगळेच कलाकार त्यांचे वेगवेगळे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात या शोमधून स्पर्धकांच्या एलिमिनेशसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय.

 

रोहित शेट्टीच्या शोमध्ये होणार मास एलिमिनेशन !

खरं तर या शोच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धक एलिमिनेट होत असतो. पण यंदाच्या सीजनमध्ये एक मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. या शोमध्ये एक मोठा शॉकींग एलिमिनेशन होणार असल्याचं बोललं जातंय. यात एक नाही, दोन नाही तर एकूण पाच स्पर्धक एकत्र या शोमधून आऊट होणार आहेत. या शोमध्ये पहिल्यांदा मास एलिमिनेशन झालेलं पहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by RKV

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 10:31 pm

Web Title: khatron ke khiladi 11 shocking twist mass elimination top 8 contestants prp 93
Next Stories
1 डिंको सिंग यांच्यावर बायोपिक बनवणार होता शाहिद कपूर; प्रोडक्शनची घेतली होती जबाबदारी
2 कंगनाने काम नसल्याचं गायलं रडगाणं; म्हणाली, “कर भरला नाही म्हणून सरकार व्याज घेतंय”
3 रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ
Just Now!
X