News Flash

KKK11 : श्नेता तिवारीने फ्लॉंट केले एब्ज ; अर्जुन बिजलानी म्हणाला, कोणत्या च्यवनप्राशची जादू आहे ?

दोघांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘खतरों के खिलाडी’ची टीम केपटाउनमध्ये पोहोचली आहे. ही सगळी मंडळी केपटाउनमध्ये मजा करताना दिसून येतेय. याचे अनेक फोटोज आणि व्हिडीओजही त्यांनी शेअर केले आहेत. यातील अर्जुन बिजलानीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अर्जुन हा श्वेता तिवारीला तिच्या फिटनेसच्या मागचं गुपित विचारताना दिसून येतोय.

श्वेत तिवारीने फ्लॉंट केले एब्ज
या व्हिडीओमध्ये श्वेता तिवारी चालताना दिसून येतेय. त्यावेळी अर्जुन तिला विचारतोय, तु कोणता च्यवनप्राश खातेस ? यावर उत्तर देताना श्वेता तिवारी म्हणते, ‘हार्ड वर्क’!. त्यानंतर अर्जुन श्वेता तिवारीला तिचे एब्ज दाखव असं सांगतो. यावेळी अर्जुन म्हणतो, “श्वेता एब्ज सुद्धा फ्लॉंट करतेय”. श्वेता आणि अर्जुनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिवारीची ट्रांसफॉर्मेशन जर्नी बरीच चर्चेत आहे. श्वेताने तिचं वजनही बरंच कमी केलंय. तिने तिच्या डाएटवर लक्ष दिलंय आणि सोबतच वर्कआऊटही करतेय. सोशल मीडियावरही तिने अनेकदा तिच्या वेट लॉस जर्नी बाबत गोष्टी शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये तिने लिहिलं की, “वजन कमी करणं हे काही सोप्पं काम नाही, खूप अवघड असतं हे. यासाठी तुम्हाला प्रचंड निष्ठेची गरज असते. सेल्फ कंट्रोलही यात महत्त्वाचा असतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

सध्या श्वेता तिवारी तिच्या पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत आली आहे. श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली या दोघांच्या नात्यांमधले संबंध बिघडले आहेत. दोघांनी एकमेकांबद्दल असलेला द्वेष सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. इतकंच नाही तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ही करत आहेत. श्वेताने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पती अभिनव हा तिच्याकडून मुलगा रेयांशला हिसकावून घेऊन जाताना दिसून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 12:39 pm

Web Title: khatron ke khiladi 11 shweta tiwari flaunts her abs arjun bijlani asks this funny question prp 93
Next Stories
1 सुरेश रैना पाठोपाठ भज्जीच्या मदतीला धावून आला सोनू सूद, म्हणाला…
2 करण जोहरच्या प्रतिस्पर्धी निर्मात्यासोबत कार्तिक आर्यन करणार काम?
3 सनी लिओनी आहे ‘इतक्या’ कोटींची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती विषयी
Just Now!
X