04 March 2021

News Flash

Khatron Ke Khiladi 8: ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर

नुकतेच अंतिम फेरीचे शूटींग झाले

खतरो के खिलाडी ८

‘खतरो के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स पाहायला मिळत आहेत. सेलिब्रिटींनी जीव मुठीत घेऊन केलेल्या स्टंट्सना प्रेक्षकांचीही पसंती मिळतेय. त्याचमुळे ‘खतरो के खिलाडी ८’ टीआरपीमध्ये अग्रस्थानी आहे. २२ जुलैला सुरु झालेल्या या शोची अंतिम फेरी आता जवळ आली असून, कोणता सेलिब्रिटी विजेता ठरणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.

वाचा : Padmavati first look राणी पद्मावती पधार रही हैं..

तत्पूर्वी, ‘खतरो के खिलाडी ८’ च्या अंतिम फेरीत शांतनू महेश्वरी, हिना खान आणि रवी दुबे या तीन स्पर्धकांनी स्थान मिळवल्याचे कळते. गेल्या आठवड्यात ‘तिकीट टू फिनाले’ जिंकणारी निया शर्मा ही पहिली स्पर्धक होती. मात्र, आता हाती आलेल्या वृत्तानुसार अंतिम तीन स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात नियाला अपयश आल्याचे कळते. नुकतेच अंतिम फेरीचे शूटींग झाले असून, याआधी शोमधून बाहेर गेलेले इतर स्पर्धकही आपल्या मित्रांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उपस्थित होते.

वाचा : Ragini MMS Returns ‘रियाने माझा लैंगिक छळ केला नाही’

शांतनू महेश्वरीने ‘खतरो के खिलाडी ८’ चा किताब आपल्या नावावर केल्याची चर्चा आहे. पण, त्याबद्दल कोणतीही अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सुरुवातीपासूनच शांतनू हा अंतिम फेरीसाठी योग्य दावेदार असल्याचे त्याने केलेल्या स्टंट्समध्ये पाहायला मिळाले. त्याने एकदाही त्याच्या गळ्यात ‘फिअर फंदा’ पडू दिला नव्हता. तर, दुसरीकडे टेलिव्हिजनची आवडती ‘बहू’ अक्षरा म्हणजेच हिना खान आणि अभिनेता रवी दुबे यांनीही त्यांच्या स्टंट्समध्ये सातत्य राखले. त्यामुळे या तिघांमध्ये नक्की कोण विजेता होणार हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 1:18 pm

Web Title: khatron ke khiladi 8 between shantanu maheshwari hina khan nia sharma ravi dubey who is the winner
Next Stories
1 रागीट ऋषींनी ट्विटरवर महिलेसाठी वापरले अपशब्द
2 … म्हणून सलमान ऑनस्क्रिन किस करत नाही
3 Ragini MMS Returns : ‘रियाने माझा लैंगिक छळ केला नाही’
Just Now!
X