25 October 2020

News Flash

‘खतरों के खिलाडी १०’मध्ये सहभागी होणार हे स्पर्धक?

अमृता खानविलकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्पर्धकांची माहिती दिली आहे

छोट्या पडद्यावरील गाजलेला रिअॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी.’ आत अधिक अॅक्शन स्टंटसह ‘खतरों के खिलाडी’ पुनरागमन करणार आहे. ‘खतरों के खिलाडी’ पर्व १० लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या पर्वामध्ये मराठ मोळी आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर सहभागी होणार असल्याचे म्हटले जात होते. आता या शोमध्ये आणखी कोणते स्पर्धक सहभागी होणार हे समोर आले आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये तिने ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे सांगितले आहे. अभिनेता करण पटेल, कोरियोग्राफ धर्मेश येलांदे, अभिनेत्री अदा खान, अभिनेत्री तेजस्वी प्रकाश, अभिनेता बलराज सयाल, अभिनेत्री करिश्मा तन्ना, अभिनेता शिविन नारंग, आर जे मलिश्का, भोजपूरी अभिनेत्री राणी चॅटर्जी, क्रिकेटपटू युवराज सिंग हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. तिने स्टोरीवर या सर्वांचे फोटो शेअर करत ‘#KKK’ असे लिहिले आहे. त्यामुळे हे स्पर्धक ‘खतरों के खिलाडी’ पर्व १०मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

याआधी अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये सहभागी व्हावे की नाही असा प्रश्न विचारला होता. तिने हो की नाही असे देखील पोस्ट केले होते. तिच्या या पोस्टमुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 3:33 pm

Web Title: khatron ke khiladi season 10 participant avb 95
Next Stories
1 ‘लागीरं झालं जी’नंतर शितलीचं ‘या’ मालिकेतून कमबॅक
2 जिवलगा मालिकेतील अमृता खानविलकरचा प्रवास संपला?
3 ‘मीडियम स्पाइसी’ला सागर देशमुखचा तडका
Just Now!
X