28 February 2021

News Flash

मलाही सुशांत बनवू इच्छितात; अभिनेत्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच खेसारी लालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो या इंडस्ट्रीमधील लोकं मला सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात असे बोलताना दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

खेसारी लालने नुकताच फेसबुक लाइव्ह केले होते. त्याने भोजपुरी इंडस्ट्रीमधील कोणाचेही नाव न घेता इंडस्ट्रीमधील लोकांवर निशाणा साधला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान तो भावुक झाल्याचे देखील दिसत आहे.

‘मला असे वाटते भोजपूरी इंडस्ट्रीमधील लोकं मला दुसरा सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात. जितकं प्रेम सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळाले होते तसेच काहीसे आणि तितकंच प्रेम मला भोजपूरी इंडस्ट्रीतून मिळत आहे. पण मी इतका कमजोर नाही कारण प्रेक्षकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माहिती नाही लोकांना माझ्यामुळे काय त्रास होत आहे?’ असे खेसारी लाल व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

पुढे तो म्हणाला, ‘मी २०११ साली इंडस्ट्रीमध्ये आलो. लोकांना ते आवडले नाही. बहुतेक माझे चित्रपट हिट ठरतात, मी समाजसेवा करतो त्यामुळे त्यांना मी आवडत नाही. लोकांना वाटत आहे मी देखील सुशांत सिंह राजपूतसारखे टोकाचे पाऊल उचलेन, पण मी असे काही करणार नाही. मला विरोध करणाऱ्या लोकांकडे पैसे खूप आहेत पण त्या पैशाने ते केवळ वस्तू खरेदी करु शकतात, सम्मान नाही. माझ्यासोबत जनता आहे, त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी इंडस्ट्रीमध्ये टिकलो आहे. माझ्यासाठी चाहते संपूर्ण बिहार बंद करु शकतात. त्यामुळे अशा लोकांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 3:26 pm

Web Title: khesari lal yadav emotional in facebook live avb 95
Next Stories
1 फास्टॅग नव्हे स्लोटॅग! कोल्हापूर-पुणे प्रवासात गीतकार संदीप खरेंना बसला फटका, प्रशासनाला केली ‘ही’ विनंती
2 दिशाने शेअर केला देसी लूकमधील फोटो, सोशल मीडियावर चर्चेत
3 ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात हा अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका; फर्स्ट लूक आला समोर
Just Now!
X