‘खिचडी’, ‘बा बहू और बेबी’ आणि ‘कहानी घर घर की’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सुचिता त्रिवेदी हिने वयाच्या ४२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. गुजरातमधल्या भावनगर इथं पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुचिताने निगम पटेल यांच्याशी लग्नगाठ बांधली असून गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते.

मुंबईत सुचिताचा हळद समारंभ पार पडला. तर कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये विवाहसोहळा पार पडला. लग्नसोहळ्याचे फोटो सुचिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/BoCzfOeHqIo/

https://www.instagram.com/p/BoElmUqH7lQ/

वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवू इच्छितो रोहित शेट्टी

सुचिताच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला बऱ्याच टेलिव्हिजन कलाकारांना हजेरी लावली होती. रिद्धी डोग्रा, राकेश वसिष्ठ, निशांत भट्ट आणि क्रितिका देसाई हे कलाकार मेहंदी कार्यक्रमाला उपस्थित होते. गेल्या १५ वर्षांपासून सुचिता टीव्ही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. ‘फिराक’, ‘कुछ कुछ लोचा है’ आणि ‘मिशन कश्मीर’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली. १०८३ मध्ये ‘वो सात दिन’ या चित्रपटातून सुचिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. ‘बा बहू और बेबी’ या मालिकेत तिने साकारलेली मीनाक्षी ठक्करची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.