19 August 2019

News Flash

आठवणींमध्ये रमवणारा ‘खिचिक’

नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे

अतिशय वेगळ्या नावामुळे “खिचिक” या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असे हे पोस्टर आहे. नेहमीच्या धाटणीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळे दिसत असल्याने ‘खिचिक’ लक्षवेधी ठरत आहे.

या चित्रपटाची निर्मीती कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी केली आहे. तसेच पराग जांभुळे आणि अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. योगेश कोळी यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून गुरु ठाकूर आणि दत्ता यांनी लिहिलेल्या गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

चित्रपटाच्या नावातून नीटसं काही कळत नसल्याने प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

First Published on July 19, 2019 2:12 pm

Web Title: khichik marathi upcoming movie poster is release avb 95