News Flash

“अ‍ॅक्शन हिरोंचे फॅन असाल तर हा चित्रपट जरूर पाहा”; हृतिक रोशनचा चाहत्यांना सल्ला

हृतिक रोशनची आई आहे 'या' अ‍ॅक्शन हिरोची फॅन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ट्विट्स, ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी तो अ‍ॅक्शनस्टार अभिनेता विद्युत जामवालमुळे चर्चेत आहे. विद्युतचा ‘खुदा हाफिज’ हा चित्रपट हृतिकला प्रचंड आवडला आहे. हा चित्रपट आवर्जून पाहा असा सल्ला त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे.

अवश्य पाहा – महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत घोटाळा केल्याप्रकरणी अभिनेत्रीला तुरुंगवास

अवश्य पाहा – कुंडली न जुळल्यानं अभिनेत्रीने मोडलं लग्न

हृतिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन विद्युतची स्तुती केली आहे. तो म्हणाला, “माझी आई विद्युतची खूप मोठी फॅन आहे. त्याला ती सोशल मीडियावर देखील फॉलो करते. अलिकडेच विद्युतचा ‘खुदा हाफिज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट खूप छान आहे. यातील अ‍ॅक्शन सीन, गाणी, कथानक सर्वकाही छान आहे. खुदा हाफिजच्या टीमला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. जर तुम्ही अ‍ॅक्शन चित्रपटांचे फॅन असाल तर हा चित्रपट जरूर पाहा.”

‘खुदा हाफिज’ हा एक अ‍ॅक्शनपट आहे. १४ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि अभिनेता विद्युत जामवाल यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एक महिला नोकरीच्या निमित्ताने विदेशात जाते. तिथे तिचं अपहरण केलं जातं. त्यानंतर तिचा पती तिला शोधण्यासाठी विदेशात जातो. दरम्यान घडणाऱ्या घडामोडिंवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात कमालीचे अ‍ॅक्शन सीन्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 6:01 pm

Web Title: khuda haafiz vidyut jammwal hrithik roshan mppg 94
Next Stories
1 पाहा तैमुरने आई-बाबांसाठी तयार केलेला बाप्पा; फोटो होतोय व्हायरल
2 …म्हणून निपुण धर्माधिकारीकडे करतात चांदीच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा
3 VIDEO : अजय देवगणने अनोख्या पद्धतीने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Just Now!
X