बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मोदी सरकारकडून Y+ श्रेणीतील सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. सध्या कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दित द्वंद्व सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाला ही सुरक्षा देण्यात येत आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर हिने नाराजी व्यक्त केली आहे. “खरंच कंगनाला Y+ श्रेणीतील सुरक्षा देणार का? आणि ही सुरक्षा नेमकी का दिली जातेय?” अशा आशयाचं ट्विट करुन खुशबूने केंद्राला प्रश्न विचारले आहेत.

अवश्य पाहा – १३ किलो वजन कमी करणाऱ्या ‘फॅट’ अभिनेत्रीचा ‘फीट’ लूक

अवश्य पाहा – “आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

यापूर्वी अशीच काहीशी टीका अभिनेत्री कुब्रा सैत, स्वरा भास्कर आणि टीएमसी नेता महुआ मोइत्रा यांनी देखील केली होती. “ट्विटरवरुन टिवटिव करणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्रीला Y+ सुरक्षा का देण्यात आली. आपल्या देशात आधिच पोलिसांची कमतरता आहे. १३८ नागरिकांमागे एक पोलीस आहे. उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा आपण योग्य प्रकारे वापर करायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन महुआ मोइत्रा यांनी केंद्र सरकारबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी करणाऱ्या कंगनावर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबई येणार असल्याचं ठरवलं आहे. मात्र, तिच्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.