24 November 2020

News Flash

खुशीच्या फोनच्या वॉलपेपरवरील श्रीदेवी यांचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

श्रीदेवीला जाऊन आता २ महिने होत आले मात्र तिचे मुलींच्या आयुष्यात असणारे स्थान अढळ आहे आणि राहीलही.

आईचे आपल्या आयुष्यात असणारे स्थान हे शब्दांच्या पलिकडचे असते. मग ती एखाद्या सामान्य व्यक्तीची आई असो किंवा अगदी एखाद्या सेलिब्रिटीची. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी हीचे निधन ही सर्वांनाच चटका लावून जाणारी गोष्ट होती. तिचे चाहते आणि नातेवाईक अजूनही या धक्क्यातून पुरेसे सावरलेले नाहीत. तिच्या मुलींसाठीही हा धक्का पचवणे खऱ्या अर्थाने अवघड गोष्ट आहे. एकाएकी आईचे नसणे काय असते हे जान्हवी आणि खुशी कपूर अनुभवत आहेत. श्रीदेवीला जाऊन आता २ महिने होत आले मात्र तिचे मुलींच्या आयुष्यात असणारे स्थान अढळ आहे आणि राहीलही. श्रीदेवी आपली मुलगी जान्हवी हीचा पहिलावहिला चित्रपटही पाहू शकली नाही. धडक या चित्रपटातून जान्हवी कपूर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. नुकतेच तिने आपल्या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले आहे. तर खुशी आपल्या मित्रमैत्रीणींबरोबर वेळ घालवत आहे. मुंबईतील एका रेस्तराँमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत गेली असतानाचा तिचा फोटो व्हायरल झाला होता.

यावेळी तिच्या मोबाइलमधील वॉलपेपरकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. आपल्या स्क्रीनसेव्हरवर तिने आई श्रीदेवीसोबतचा लहानपणीचा फोटो ठेवला आहे. यावर केवळ क्युट फोटोच नाही तर एक भावनिक असा मेसेजही लिहीला होता. जो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये खुशी आई श्रीदेवीच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरीही त्यातल्या गोबऱ्या गालांमुळे खुशी एकदम क्युट दिसत आहे. याआधी खुशीची मोठी बहीण जान्हवीने आई गेल्याचे दु:ख सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले होते. जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहीले होते, ‘आईच्या नसण्याने माझ्या आय़ुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. मला माहिती आहे की आता मला या पोकळीसोबतच जगायचे आहे. माझे मित्रमैत्रीणी मला नेहमी मी खूप नशीबवान आहे असे म्हणायचे, ते तुझ्यामुळेच होते. माझ्यासाठी कोणतीच अडचण कधी मोठी नव्हती कारण माझ्याजवळ तु होतीस.’ सध्या जान्हवी आणि खुशी आपली चुलत बहीण सोनम कपूर हीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 5:22 pm

Web Title: khushi kapoor phone wallpaper viral with mother sridevi
Next Stories
1 प्रियांकाने लग्न केलंय म्हणे… चर्चा तर होणारच
2 Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार ‘तुझी माझी जोडी’चा खेळ
3 Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीचा पहिला कॅप्टन झाला बेघर
Just Now!
X