05 March 2021

News Flash

दीपिका- कतरिनाला पाहिल्यानंतर…; कियाराने केला ‘या’ गोष्टीचा खुलासा

दीपिका-कतरिनाला पाहून कियाराला येतो राग?

कलाविश्वातील बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री कियारा आडवाणीकडे पाहिलं जातं. कियारा बऱ्याच वेळा तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. अलिकडेच कियाराने करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉण्ट या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कियाराने अनेक गोष्टींचा खुलासा केला असून तिला कलाविश्वातील दोन आघाडीच्या अभिनेत्रींची इर्षा वाटते असं सांगितलं.

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या झिरो फिगर आणि सुडौल बांध्यामुळे चर्चेत असतात. यामध्ये करीना कपूर- खान, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यासारख्या अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यामुळेच कियाराला कोणत्या अभिनेत्रीच्या फिगरकडे पाहिल्यानंतर मनात इर्षेची भावना निर्माण होते असा प्रश्न करीनाने विचारला. त्यावर कियाराने दोन आघाडीच्या अभिनेत्रींची नाव सांगितलं.

दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्याकडे पाहिल्यानंतर मला कायम इर्षा होते. कारण त्या अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्या दोघीही उंच आणि फिट आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतेही कपडे परिधान केले तरी त्यांना ते छानच दिसतात, असं कियारा म्हणाली.

दरम्यान, कियाराचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. सध्याच्या घडीला कियारा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१४ मध्ये कियाराने कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटानंतर कियाराने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अलिकडेच कियारा लक्ष्मी या चित्रपटात झळकली असून लवकरच ती ‘इंदु की जवानी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 6:12 pm

Web Title: kiara aadvani is jealous of deepika and katrinas fitness dcp98
Next Stories
1 चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘नटसम्राट’
2 ड्रायव्हरनंतर सलमानच्या मॅनेजरलाही करोनाची लागण
3 अभिनेत्री दिव्या भटनागरला करोनाची लागण’; प्रकृती नाजूक
Just Now!
X