News Flash

ओळख पटवण्यासाठी कियाराला काढावा लागला मास्क, नेटकऱ्यांना आठवला ‘एमएस धोनी’ चित्रपटातील ‘तो’ सीन

कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल..

kiara advani,
कियाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी कियाराच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील एका सीनची आठवण आल्याचे सांगितले आहे.

कियाराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ  विमानतळावरील आहे. या व्हिडीओत कियारा विमानतळावर मास्क घालून पोहोचली होती. तर तपासनी दरम्यान, सीआयएसएफच्या ऑफिसरने कियाराची ओळख निश्चित करण्यासाठी तिला मास्क काढायला सांगितला. त्यानंतर कियारा तिचा मास्क काढते आणि तिची ओळख दाखवते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा : ‘पहिले संघर्ष करूनही चित्रपट मिळत नव्हते आणि आता…’, पंकज त्रिपाठीने केला खुलासा

‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात कियाराने साक्षीची भूमिका साकारली होती. तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतने धोनीची भूमिका साकारली होती. जेव्हा धोनी हॉटेलमध्ये येतो, तेव्हा साक्षी त्याच्याकडे ओळखपत्र मागते. या सीनची आठवण नेटकऱ्यांना कियाराच्या या व्हिडीओवरून आली आहे.

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

आणखी वाचा : ‘ती बेडवर माझी वाट पाहत होती…’, महेश भट्ट यांनी परवीन बाबी विषयी केला होता खुलासा

कियारा लवकरच ‘शेरशाहा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या आयुष्यावर आधारीत आहे. तर ‘शेरशाह’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 12:34 pm

Web Title: kiara advani asked to remove mask at airport to confirm identity netizens remembered this scene from ms dhoni movie dcp 98
Next Stories
1 “मी अडल्ट सिनेमांच्या विरोधात नाही”; राज कुंद्रा प्रकरणात अभिनेत्री सोमी अलीचं खळबळजनक वक्तव्य
2 ‘भाभीजी घर पर हैं’ फेम सौम्या टंडनचा करीना कपूरच्या गाण्यावर डान्स
3 ‘चित्रपट फ्लॉप ठरला आणि डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले’; दिग्दर्शकाने सांगितला अनुभव
Just Now!
X