News Flash

कियाराच्या या छोट्या बॅगची किंमत माहितीये का ?

या बॅगची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत. बॉलिवूडची बेबो करिना कपूर, सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. आता या यादीमध्ये कियारा आडवाणीचादेखील समावेश झाला आहे.

‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या यशानंतर कियारा फार आनंदी असल्याचे दिसत आहे. ३१ जुलै रोजी कियाराने तिचा २७वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवशी तिने बॉलिवूडमधील मित्रमैत्रीणींसाठी एक पार्टी आयोजीत केली होती. दरम्यान कियाराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सॅटिन फायब्रिकचा फिश कट प्लेन स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला होता. त्यावर तिने अॅक्सेसरीज ऐवजी छोटी बॅग घेतली होती. पण ही छोटी बॅग सर्वांचे आकर्षण झाली.

या छोट्या बॅगची किंमत जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. ही बॅग आकाराने लहान असली तरी तिची किंमत लाखो रुपये आहे. ही बॅग कियाराने लग्जरी ब्रॅन्ड ‘Chanel’ची घेतली आहे. तिची किंमत जवळपास ५ हजार डॉलर म्हणजे ३ लाख ५० हजार रुपये आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 11:42 am

Web Title: kiara advani bag price avb 95
Next Stories
1 सुषमा स्वराज यांच्या आठवणीने बॉलिवूडही हळहळले
2 #MeToo : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करणार नाही – दीपिका
3 …जेव्हा सुषमा स्वराज यांनी चित्रपटाच्या सेटवर केली होती एण्ट्री
Just Now!
X