28 May 2020

News Flash

..म्हणून कियाराला करावे लागले गुंडांशी दोन हात

कियाराने गुंडांना अक्षरश: बदडून काढले.

‘कबीर सिंह’ या सुपरहिट चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कियारा आडवाणी चक्क गुंडांबरोबर केलेल्या मारामारीमुळे चर्चेत आहे. तिने लखनऊमधील गोमती नगर येथे गुंडांना अक्षरश: बदडून काढले. हे गुंड तेथील मुलींची छेड काढत होते. या गुंडांना अद्दल घडवण्यासाठी तिने त्यांच्याशी दोन हात केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

खरं तर, ही मारामारी काही खरीखुरी नव्हती. ‘इंदू की जवानी’ या आगामी चित्रपटातील एका दृष्यासाठी तिने ही मारामारी केली. परंतु शॉपिंग मॉलमध्ये चित्रित केलेल्या या दृष्याच्यावेळी दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता याने काही हिडन कॅमेरांचा वापर केला होता. त्यामुळे चित्रिकरणाच्या वेळी मॉलमध्ये उपस्थित असलेल्या इतर लोकांना ती मारामारी खरोखरचीच असल्याचा भास झाला. परिणामी सोशल मीडियावर कियाराच्या फायटिंगची चर्चा सुरु झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटाने कियाराला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. या प्रसिद्धीच्या जोरावर तिला एक दोन नव्हे तर तब्बल पाच चित्रपट मिळाले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक म्हणून कियारा चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 3:20 pm

Web Title: kiara advani beats up goons for film shoot in lucknow mppg 94
Next Stories
1 ‘इंडियन २’मधील या दृश्यावर तब्बल ४० कोटींचा खर्च!
2 तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’
3 जान्हवीच्या नव्या कारचं जाणून घ्या ‘श्रीदेवी’ कनेक्शन
Just Now!
X