अभिनेता टायगर श्रॉफ याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून तारा सुतारिया ही नवोदित अभिनेत्री पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्येही ती झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र या चित्रपटामध्ये तिच्याऐवजी अन्य एका अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डेक्कन क्रॉनिकल’नुसार, ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये झळकणार आहे. अर्जुन रेड्डी हा दाक्षिणात्य चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन संदीप रेड्डी बांगा यांनी केलं. या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळेच त्याच्या हिंदी रिमेकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटासाठी प्रथम तारा सुतारियाच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र आता ताराऐवजी कियारा झळकणार असल्याचं समोर आलं आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं नाव अद्याप निश्चित झालं नसून तो २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक संदीप वोंगा यांनी कियाराकडे या चित्रपटाविषयी विचारणा केल्यावर तिने तात्काळ तिचा होकार कळविला. या चित्रपटासाठी ती प्रचंड उत्साही असल्याचं चित्रपट दिग्दर्शकांनी सांगितलं. ‘अर्जुन रेड्डी’मध्ये शाहिदने एका डॉक्टराच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अर्जुन रेड्डी हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय असून तो सुपरहिट ठरला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani finalised opposite shahid kapoor arjun reddy hindi remake
First published on: 25-09-2018 at 12:35 IST