25 February 2021

News Flash

“हृतिकने अंघोळ करुच नये”; कियाराने व्यक्त केली अनोखी इच्छा

 नेहाच्या प्रश्नावर कियारानं दिलं अजब उत्तर; पाहा व्हिडीओ...

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी ती अभिनेता हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर यांच्यामुळे चर्चेत आहे. या दोन अभिनेत्यांनी कधीही अंघोळ करु नये अशी विचित्र इच्छा तिने व्यक्त केली आहे.

कियारा लवकरच लक्ष्मी बॉम्ब या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहाच्या प्रश्नावर उत्तर देताना हृतिक आणि आदित्यने कधीही अंघोळ करु नये अशी इच्छा तिने व्यक्त केली.

जर एखाद्या घरात अनेक बॉलिवूड कलाकारांना एकत्र बंद केलं तर त्याचं मनोरंजन कोण करेल? सर्वप्रथम असा प्रश्न नेहाने कियाराला विचारला या प्रश्नावर तिने ‘अक्षय कुमार’ हे नाव घेतलं. त्यानंतर कुठला अभिनेता अंघोळ करण्यास नकार देईल? असा प्रश्न तिने विचारला. यावर क्षणाचाही विलंब न करता कियाराने ‘हृतिक रोशन’ आणि ‘आदित्य रॉय कपूर’ ही दोन नावं घेतली. “या दोघांनी कधीही अंघोळ करु नये असं मला वाटतं. ते दोघेही अंघोळ न करताच छान दिसतात.” असही कियारा म्हणाली. तिच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 5:57 pm

Web Title: kiara advani hrithik roshan aditya roy kapur no filter neha mppg 94
Next Stories
1 Video : ‘नेहू दा व्याह’ प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा, नेहा-रोहनची रोमॅण्ट्रिक केमिस्ट्री
2 सलमान आता क्रिकेटच्या मैदानातही; विकत घेतली टीम
3 ‘विरुष्काच्या बाळाला नेपोकिड म्हणणार का?’ घराणेशाहीच्या वादात साकिब सलीमची उडी
Just Now!
X