23 September 2020

News Flash

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीमुळे मी पाहिले कलाविश्वात येण्याचे स्वप्न – कियारा अडवाणी

सध्या कियारा 'शेरशहा' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

कियारा अडवानी

‘कबीर सिंग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटातल्या शाहिदच्या भूमिकेसोबतच कियाराच्या भूमिकेचही खूप कौतुक झालं. आता कियारा अडवाणी ‘शेरशहा’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातदेखील ती दिसणार आहे.

कियाराने आताच तिने सिनेसृष्टीतील करियर सुरु केले आहे. करीना कपूरसोबत काम करण्याविषयी तिला विचारले असता ती म्हणाली की, “मी लहानपणापासून करीनाचे चित्रपट बघत आले आहे. तिच्यामुळेच मला अभिनेत्री व्हावेसे वाटले. करीना गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतेय. प्रत्येक चित्रपटातील तिची भूमिका जसा वेळ जातोय तशी अधिकच प्रगल्भ होतेय.”

“मी करीनाला कधीही पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिने ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटामध्ये केलेली व्यक्तिरेखाच येते. तिचे संवाद माझ्या डोक्यात अजूनही आहेत. माझ्यासाठी ती ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटातील पूजाच आहे. त्या चित्रपटात तिचा एक डायलॉग आहे, “तुम्हे कोई हक नही बनता की तुम इतनी खूबसूरत लगो” मला असं वाटतं की, हा डायलॉग तिच्यासाठी लिहिला आहे. ती अतिशय सुंदर आहे. तिच्यामुळेच मला अभिनेत्री व्हावंसं वाटलं” असंही कियारा म्हणाली.

सध्या कियारा ‘शेरशहा’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 11:32 am

Web Title: kiara advani kareena kapoor kabhi khushi kabhi gum djj 97
Next Stories
1 Super 30 : चित्रपटातील हा प्रसंग पाहून आनंद कुमारांच्या आईला अश्रू अनावर
2 Box Office Collection : जाणून घ्या, ‘सुपर ३०’ची पहिल्या दिवसाची कमाई
3 प्रियकर विकी जैनविषयी अंकिता म्हणते…
Just Now!
X